नोकरीविषयी एसएमएसद्वारे माहिती उमेदवारांनी मोबाईलची नोंद करावी
कोल्हापुरच्या जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयांमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांना संगणकीय प्रणालीद्वारे एसएमएसद्वारे मोबाईलवर विविध प्रकारचे संदेश देण्याचे योजिले आहे. पात्र उमेदवारांची नोकरीसाठी नियोक्त्याकडे पाठवणी झाल्यास एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. याशिवाय नुतनीकरणाच्या सुचना, रोजगार मेळाव्यातून होणारी भरती याविषयीचे संदेश देण्यात येणार आहेत. उमेदवारांनी या सुविधेचा लाभ मिळण्यासाठी नाव नोंदणी करताना अद्यावत मोबाईल क्रमांकही नोंदवावा. मोबाईल क्रमांक बदलला असल्यास तशी नोंद करावी.
नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात मोबाईल क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल पत्ता असल्यास नोंद करावी. कार्यालयाच्याhttp://ese.mah.nic.inया संकेतस्थळावर माझ्या संपर्कामध्ये बदल या ऑप्शनवर क्लीक करुन उमेदवारांना कोठूनही आणि केंव्हावी हा बदल करता येईल. एसएमएस सेवेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपल्या नोंदणीची माहिती अद्ययावत करावी असे आवाहन कोल्हापुरच्या रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्गाचे सहाय्यक संचालक वसंत माळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२३१/२५४५६७७ वर संपर्क साधावा.
Subscribe to:
Posts (Atom)