ग्रेट बाबूराव पेंटर राजाराम महाराजांचं पेंटींग करताना
हे भव्य तैलचित्र आजही न्यू पॅलेस येथे आंत गेल्यावर उजव्या हाताला आहे.... वैशिष्ट्य म्हणजे हे तयार केले खरी काॅर्नर येथील कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या घरी तिसऱ्या मजल्यावर.कधी गेला तर पहा अतिशय चिंचोळ्या जिन्यातुन आपणच जाणे अवघडच पण जिथं हे पेंटिंग तय्यार झाले तिथुनच कसंबसं तेवढ्याच जाडीची पोकळी तयार करण्यात आली नि तिसऱ्या मजल्यावरून ते खाली उतरून भव्य जाड फ्रेम जोडुन हे राजवाड्यात नेले..
आठवणीतलं कोल्हापूर. भिशी_फुटते_तेव्हा..
"उद्या संध्याकाळी भिशीमंडळाची भिशी फुटणार आहे. सर्व सभासदांनी भिशी नेण्यासाठी उपस्थित रहावे", गल्लीतल्या वार्ताफलकावर लिहिलेली ही माहीती वाचली आणि मन अलगद भूतकाळात गेले. कोल्हापुरात अशी भिशीमंडळे एक समांतर अर्थव्यवस्था मजबूत करत होती. शहरात वेगवेगळ्या चौकांमध्ये टेबल खुर्ची मांडलेली असायची. भोवतीने मस्तपैकी रांगोळी काढलेली असे. टेबलावर भिशीचं रजिस्टर, पेन, भिशीची पाकिटे असा जामानिमा असे. टेपरेकॉर्डरवर मिथूनची डान्सवाली गाणी वाजत असत. लोकं येतील तसतसे भिशीचं वाटप होई. भिशी फुटली की नोटांची थप्पी असलेलं पाकीट खिशात घालायचं. पाकिटावर मुद्दल, व्याज आणि एकूण रक्कम लिहलेली असे. मग खिसा चाचपत चाचपतच दिवाळी खरेदी उत्साहानं पार पडायची.
खरंच....येते का हो ?
परवा दुकानात लक्ष्मीपूजनाचे पुढे विकत होतो आणि समोर साक्षात लक्ष्मीच.......
माझ्यासमोर हात पसरून........ स्तब्ध.. उभी...
माझ्या हातात लक्ष्मीपूजनाचा पुडा,
पुडा बाजूला ठेवला आणि तिच्या हातावर पाच रुपये ठेवले.......
मनातून लाज वाटली......
हल्ली मनातली लाज तोंडावर न दिसण्याचे कसब अंगात आलंय......
पोराला सावरत लक्ष्मी लाखमोलाचा आशीर्वाद पाच रुपयात देऊन गेली......
लाल भडक रंगाच्या साडीत....
बाजूला दोन पांढरे हत्ती.....
हातात गुलाबी कमळाचे फूल ......
अंगावर पिवळे धम्मक दागिने लेऊन कमळाच्या फुलावर बसायचं सोडून ही लक्ष्मी , कडेवर उपाशी तान्हं बाळ, अंगात करड्या रंगाची फाटकी साडी, दोन्ही हात पसरून भीक मागताना दिसली .......
वाईट नाही वाटलं.... लाज वाटली .
समजत असून काही करू शकलो नाही याची ...
विचार करायला किंवा कृती ( ? ) करायला वेळच नव्हता..
लक्ष्मीपूजनाचा दिवस होता ........
दुकानात ही गर्दी......................
संध्याकाळची वेळ....................
बसलो पूजेचे पुढे विकत............
........................ असं म्हणतात
फोटोग्राफर
मोबाईल ने घातला फोटोग्राफर वर घाव
पन्हाळा
पन्हाळा महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध किल्ला, थंड हवेचे ठिकाण व कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य स्थान. लोकसंख्या २,२१९ (१९७१). कोल्हापूरच्या वायव्येस सु. १८ किमी. वर कोल्हापूर-रत्नागिरी हसरस्त्याच्या दक्षिणेस सह्याद्रीच्या कुशीत एका छोट्याशा पठारावर वसले आहे. त्याची स. स. पासून उंची ८४५ मी. असून थंड हवा व रोगप्रतिबंधक पाणी यांकरिता ते प्रसिद्ध आहे.
Kolhapur Photography
Check out Awesome Photography work and Images by Kolhapur Photographers.
Kolhapur Photography : BIRDS
.
GUL SOUDE
कोल्हापुरात मार्केट यार्डात पाडव्याच्या मुहूर्तावर शेतकर्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले . जादा दराचे आमिष दाखवून , अगदी काही किलो गूळ जास्त भावाने विकण्याचे व्यापार्यांचै "नाटक "संतप्त शेतकर्यांनी हाणून पाडले
.
साधारण दरवर्षीच गुळ व्यापारी शेतकर्याँची अशाप्रकारे फसवणूक करीत असतात. मार्केट यार्डात आलेल्या गुळापैकी काही किलोच गूळ अगदी शेतकर्यांच्या कल्पने पलीकडे जादा दराने खरेदी करावयाचा आणि उरलेला गूळ कवडीमोलाने विकायचा ,असा प्रकार केला जातो .
सूज्ञ शेतकर्यांनी हा प्रकार उधळून लावला .........एक चांगली सुरवात !!
गेल्या काही वर्षात ऊस दराच्या आंदोलनाने चांगलाच जोर धरला आहे . उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा ,अशी शेतकर्याँची मागणी असत .गेल्या काही काळात रासायनिक खते , पाणीपट्टी ,मशागत अशा कामात सुमारे तिपटीनै वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे; परंतु उसाला मिळणाऱ्या दरात मात्र त्या प्रमाणात वाढ झाली नाही.
साखर कारखाने सुरु होण्याच्या अगोदरच शासनाकडून दर का निश्चित केला जात नाही ? हा एक प्रश्नच आह.े आतातर ' एफआरपी' चा मुद्दा पुढे रेटला जात आहे . ही एफआरपी च नेमकी काय 'भानगड ' हे पहावे लागेल .....
साधारण दोन वर्षापूर्वी एफआरपी होती १४५० रुपये . ती गतवर्षी झाली १७५० रुपये ! ज्यावेळी १४५० एफआरपी होती त्यावेळी आंदोलन झाले आणि शेतकऱ्यांना २००० ऊसदर मिळाला . ज्यावेळी १७५० एफआरपी झाली , त्यावेळी दर मिळाला २५०० रुपयांच्या वर !
काही जण सांगतात आम्ही एफआरपी पेक्षा जास्त दर दिला , तर काहीजण साखरेचा खुल्या बाजारातील दराचे अर्थकारण जोडतात. काहीअंशी ते खरेही आहेच , पण कारखान्यांना इतर उप पदार्थाचे उत्पन्न मिळतेच.
आता प्रश्न निर्माण होतो, कि साखर कारखान्यातील अनेक गैरव्यवहार थांबवले तर कारखान्याचे पर्यायाने ऊस उत्पादकांचे हित होईल मात्र हा पुन्हा वादातीत विषय !!
काही झाले तरी एफआरपी पेक्षा जादा दर देणे शक्य आहे हे सिद्ध होत.े मग यावर्षी पुन्हा साखरेचे दर, बँकेचे कारण आणि धोरण पुढे करुन आंदोलनाची सुरवात खरेतर शासनाकडून च होत आहे ,हे मान्य करायला हवे .
एफआरपी हा पाया धरून ऊसदर ठरत असेल तर इतर राज्यात दर जास्त दिला जातो मग महाराष्ट्रात का मिळत नाही ? हाही प्रश्न आहेच ?
ऊसदर , आंदोलन करुनच पदरात पाडून घ्यायला शेतकऱ्यांना हौस नक्कीच नाही . आणि शासनाने ही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी.....
कि एफआरपी च ही एक भानगड आहे , हे तरी कळायला च हवे.........
KOLHAPURI
Marathi Abhiman Geet
आम्ही कोल्हापुरी .........
माणसानं जे काही शोध लावलं त्यातला पादत्राणाचा शोधही महत्त्वाचा. पायाला बोचणाऱ्या दगडांचा, काट्यांचा त्रास चुकविण्यासाठी आदिमानवाच्या काळात पायाला पाला किंवा झाडाची साल बांधण्याची पध्दत होती. ग्रीस, इजिप्त या देशातील उत्खननात त्यावेळची पादत्राणे मिळाल्याचा उल्लेख आढळतो. इ. स. पूर्व काळात पादत्राणे वापरली जात. नंतरच्या काळात मेलेल्या किंवा मारलेल्या प्राण्यांच्या चामड्याला योग्य आकार देऊन ते पायाला बांधले जाई.
भारतातील पादत्राणासंबंधी वैदिक वाड्:मयात उल्लेख आढळतो. रोमनकालीन पादत्राणांशी त्याचं साम्य आढळतं. पुणेरी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापुरी चपलांची निर्मिती झाली. पुणेरी जोडा जरी जवळ जवळ नाहीसा झाला तरी जयपुरी चढाव आणि कोल्हापुरी चप्पल मात्र टिकून आहेत. कोल्हापुरी चपलांची जुनी नावं म्हणजे खास कोल्हापुरी, खास कुरुंदवाडी, खास कापशी! गावांच्या नावावरुन दिलेली. शिवाय पुडा मोरकी, पुडा पॅचिंक, पुडा अथणी, गांधीवादी अशी नावे अलिकडच्या बदलत्या काळात म्हणजे चित्रपटांच्या जमान्यात कोल्हापुरी चपलेने सुरक्षा, सिलसिला, सुहाग, जंजीर, नाचे मयूरी, दिल, मेरी आवाज सुनो, महाभारत अशीही नावे धारण केली असली तरी आपला मूळचा दर्जा व वैशिष्ट्ये कधीच सोडली नाहीत.
कोल्हापूरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळयातसुध्दा थंडपणा जाणवतो. शिवाय चालताना त्रास होत नाही. कारण त्या पूर्णत: हाताने बनविलेल्या असतात. त्या बनविण्याचे ९० ते ९५ टक्के काम महिला कामगार करतात. कोल्हापूर जिल्ह्यात या चपला तयार करुन उपजीविका करणारी साधारणत: सात हजारावर कुटुंबे आहेत. चपलांची किंमत वापरलेल्या कातड्याच्या दर्जाप्रमाणे असते





.jpg)
























.jpg)






.jpg)







