Showing posts with label MARATHI VINOD. Show all posts
Showing posts with label MARATHI VINOD. Show all posts

MARATHI VINOD

एकदा अमेरिकेत चीन,
पाकिस्तानी आणि भारतीय
चम्प्या यांना २०-२० चाबकाचे फटके
मारण्याची शिक्षा झाली.
चाबकाचे फटके मारण्या आधी सर्वांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली...

चायनीज - माझ्या पाठीवर ५
चादरी बांधा आणि मग
मला फटके द्या..
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...
मात्र ५ फटक्यातच
चादरी फाटल्या आणि १५ फटके चायनीजला पडले,
तो कोमात गेला.

आता पाकिस्तानी ची बारी..
पाकिस्तानी - माझ्या पाठीला २०
चादरी बांधा आणि मग
फटके द्या...
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...१५ फटक्यात चादरी फाटल्या आणि ५ फटक्यात पाकिस्तानी बेशुद्ध.

आता आपल्या चंम्प्याची बारी होती.

अमेरिकन - तुझी इच्छा काय आहे..?

चम्प्या - मला २० फटक्याएवजी ३० फटके मारा..पण
आधी त्या पाकिस्तानीला माझ्या पाठीला बांधा

MARATHI VINOD

जपान मध्ये एका नामांकीत साबण
कंपनीच्या कव्हर मध्ये साबण न टाकताच
तसेच रिकामे
कव्हर
पाठवून दिले.....
असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून
तिथल्या इंजिनियर्सने ६० हजार डॉलर चे
एक्स-रे मशीन
विकत घेतले आणि प्रत्येक साबणाचे कव्हर
चेक करून पुढे
पाठवू लागले.....
.
.
.
असाच प्रकार
एकदा आपल्या महाराष्ट्रात झाला,
आपल्या मराठी इंजिनियर्स ने काय केले
असेल!!!!
.
.
विचार करा....
.
.
६०० रूपायचा टेबल फॅन
आणला आणि साबणाचे कव्हर
त्या समोरून पाठवले, रिकामे कव्हर
आपोआप उडून गेले....
.....
नाद
नाही करायचा मराठी इंजिनियर्सचा...
एकदा एक मुलगा नेपाळ मध्ये मेंढ्या चारत होता..तितक्यात तिथे एक टुरीस्ट आला..
टुरीस्ट - हि मेंढी किती दुध देते?
मुलगा - पांढरी कि काळी?
टुरीस्ट - पांढरी
मुलगा - २ लिटर देते..
टुरीस्ट - आणि काळी?
मुलगा - ती पण २ लिटर देते.
टुरीस्ट - आणि वूल किती देते?
मुलगा - कोणती काळी कि पांढरी?
टुरीस्ट - काळी
मुलगा - काळी ४ किलो देते.
टुरीस्ट - आणि पांढरी?
मुलगा - ती पण ४ किलो देते..
टुरीस्ट (वैतागून) - अरे येड्या दोन्ही मेंढ्या दुध पण सारखाच देतात आणि वूल पण..मग काळी आणि पांढरी काय लावलंय..
मुलगा - खरं तर हि जी पांढरी मेंढी आहे ना...ती माझ्या वडिलांची आहे..
टुरीस्ट - आणि काळी?
मुलगा - ती पण वडिलांचीच आहे..