MARATHI VINOD

एकदा अमेरिकेत चीन,
पाकिस्तानी आणि भारतीय
चम्प्या यांना २०-२० चाबकाचे फटके
मारण्याची शिक्षा झाली.
चाबकाचे फटके मारण्या आधी सर्वांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली...

चायनीज - माझ्या पाठीवर ५
चादरी बांधा आणि मग
मला फटके द्या..
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...
मात्र ५ फटक्यातच
चादरी फाटल्या आणि १५ फटके चायनीजला पडले,
तो कोमात गेला.

आता पाकिस्तानी ची बारी..
पाकिस्तानी - माझ्या पाठीला २०
चादरी बांधा आणि मग
फटके द्या...
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...१५ फटक्यात चादरी फाटल्या आणि ५ फटक्यात पाकिस्तानी बेशुद्ध.

आता आपल्या चंम्प्याची बारी होती.

अमेरिकन - तुझी इच्छा काय आहे..?

चम्प्या - मला २० फटक्याएवजी ३० फटके मारा..पण
आधी त्या पाकिस्तानीला माझ्या पाठीला बांधा