राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला सुवर्ण पदक देणा-या राही सरनोबत हिचा सत्कार सोमवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.
राही सरनोबत हिचे दि.१८ ऑक्टोबर २०१० रोजी कोल्हापूरात आगमन होत आहे.याप्रसंगी तिचे जंगी स्वागम करण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते मानपत्र देऊन तिला गौरविण्यात येणार आहे.सत्कार समारंभाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.पोलीस अधिक्षक यशस्वी यादव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी या समारंभास उपस्थित राहणार आहेत.
राही सरनोबत हिचे कोल्हापूरात जंगी स्वागत करण्यात येत असून भव्य मिरवणूकीचे आयोजनही करण्यात आले आहे.शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरुन तिची मिरवणूक काढण्यात येणार आहे.राही सरनोबत हिच्या मिरवणुकीत सहभागी व्हावे तसेच मानपत्र प्रदान समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
e-vrutta seva