कोल्हापुरातील १०२ ग्रामपंचायतींचा खेल अभियान योजनेत समावेश






कोल्हापूरने अनेक दिग्गज खेळाडू देशासाठी दिले आहेत. सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत हे अलिकडचेच उदाहरण देता येईल. ही परंपरा अशीच पुढे चालू राहण्यासाठी पंचायत युवा क्रीडा व खेळ योजना व जिल्हा नियोजन मंडळ यांच्यामार्फत ३ लाख रूपये जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.

कला, क्रीडा, साहित्य आणि संस्कृती या सर्व क्षेत्रांत कोल्हापूर आघाडीवर आहे. राजर्षी शाहूंचा वारसा जतन करणार्‍या कोल्हापुरातील युवाशक्ती संस्कारित होऊन क्रीडा परंपरा जतन करण्यासाठी पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान योजनेअंतर्गत खेळाच्या पायाभूत सुविधा विकसित
करून क्रीडा संस्कृती अगदी खोलवर रूजावी या उद्देशाने हे अभियान कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.