MARATHI VINOD

एकदा अमेरिकेत चीन,
पाकिस्तानी आणि भारतीय
चम्प्या यांना २०-२० चाबकाचे फटके
मारण्याची शिक्षा झाली.
चाबकाचे फटके मारण्या आधी सर्वांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली...

चायनीज - माझ्या पाठीवर ५
चादरी बांधा आणि मग
मला फटके द्या..
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...
मात्र ५ फटक्यातच
चादरी फाटल्या आणि १५ फटके चायनीजला पडले,
तो कोमात गेला.

आता पाकिस्तानी ची बारी..
पाकिस्तानी - माझ्या पाठीला २०
चादरी बांधा आणि मग
फटके द्या...
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...१५ फटक्यात चादरी फाटल्या आणि ५ फटक्यात पाकिस्तानी बेशुद्ध.

आता आपल्या चंम्प्याची बारी होती.

अमेरिकन - तुझी इच्छा काय आहे..?

चम्प्या - मला २० फटक्याएवजी ३० फटके मारा..पण
आधी त्या पाकिस्तानीला माझ्या पाठीला बांधा

MARATHI VINOD

जपान मध्ये एका नामांकीत साबण
कंपनीच्या कव्हर मध्ये साबण न टाकताच
तसेच रिकामे
कव्हर
पाठवून दिले.....
असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून
तिथल्या इंजिनियर्सने ६० हजार डॉलर चे
एक्स-रे मशीन
विकत घेतले आणि प्रत्येक साबणाचे कव्हर
चेक करून पुढे
पाठवू लागले.....
.
.
.
असाच प्रकार
एकदा आपल्या महाराष्ट्रात झाला,
आपल्या मराठी इंजिनियर्स ने काय केले
असेल!!!!
.
.
विचार करा....
.
.
६०० रूपायचा टेबल फॅन
आणला आणि साबणाचे कव्हर
त्या समोरून पाठवले, रिकामे कव्हर
आपोआप उडून गेले....
.....
नाद
नाही करायचा मराठी इंजिनियर्सचा...

GUL SOUDE

कोल्हापुरात शेतकर्यांचा एल्गार !!

कोल्हापुरात मार्केट यार्डात पाडव्याच्या मुहूर्तावर शेतकर्यांनी गुळाचे सौदे बंद पाडले . जादा दराचे आमिष दाखवून , अगदी काही किलो गूळ जास्त भावाने विकण्याचे व्यापार्यांचै "नाटक "संतप्त शेतकर्यांनी हाणून पाडले
.
साधारण दरवर्षीच गुळ व्यापारी शेतकर्याँची अशाप्रकारे फसवणूक करीत असतात. मार्केट यार्डात आलेल्या गुळापैकी काही किलोच गूळ अगदी शेतकर्यांच्या कल्पने पलीकडे जादा दराने खरेदी करावयाचा आणि उरलेला गूळ कवडीमोलाने विकायचा ,असा प्रकार केला जातो .

सूज्ञ शेतकर्यांनी हा प्रकार उधळून लावला .........एक चांगली सुरवात !!
दिवाळी झाली आता ऊस दराची अन् आंदोलनाची आतषबाजी सुरु झाली ......

गेल्या काही वर्षात ऊस दराच्या आंदोलनाने चांगलाच जोर धरला आहे . उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा ,अशी शेतकर्याँची मागणी असत .गेल्या काही काळात रासायनिक खते , पाणीपट्टी ,मशागत अशा कामात सुमारे तिपटीनै वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे; परंतु उसाला मिळणाऱ्या दरात मात्र त्या प्रमाणात वाढ झाली नाही.

साखर कारखाने सुरु होण्याच्या अगोदरच शासनाकडून दर का निश्चित केला जात नाही ? हा एक प्रश्नच आह.े आतातर ' एफआरपी' चा मुद्दा पुढे रेटला जात आहे . ही एफआरपी च नेमकी काय 'भानगड ' हे पहावे लागेल .....

साधारण दोन वर्षापूर्वी एफआरपी होती १४५० रुपये . ती गतवर्षी झाली १७५० रुपये ! ज्यावेळी १४५० एफआरपी होती त्यावेळी आंदोलन झाले आणि शेतकऱ्यांना २००० ऊसदर मिळाला . ज्यावेळी १७५० एफआरपी झाली , त्यावेळी दर मिळाला २५०० रुपयांच्या वर !

काही जण सांगतात आम्ही एफआरपी पेक्षा जास्त दर दिला , तर काहीजण साखरेचा खुल्या बाजारातील दराचे अर्थकारण जोडतात. काहीअंशी ते खरेही आहेच , पण कारखान्यांना इतर उप पदार्थाचे उत्पन्न मिळतेच.
आता प्रश्न निर्माण होतो, कि साखर कारखान्यातील अनेक गैरव्यवहार थांबवले तर कारखान्याचे पर्यायाने ऊस उत्पादकांचे हित होईल मात्र हा पुन्हा वादातीत विषय !!

काही झाले तरी एफआरपी पेक्षा जादा दर देणे शक्य आहे हे सिद्ध होत.े मग यावर्षी पुन्हा साखरेचे दर, बँकेचे कारण आणि धोरण पुढे करुन आंदोलनाची सुरवात खरेतर शासनाकडून च होत आहे ,हे मान्य करायला हवे .

एफआरपी हा पाया धरून ऊसदर ठरत असेल तर इतर राज्यात दर जास्त दिला जातो मग महाराष्ट्रात का मिळत नाही ? हाही प्रश्न आहेच ?
ऊसदर , आंदोलन करुनच पदरात पाडून घ्यायला शेतकऱ्यांना हौस नक्कीच नाही . आणि शासनाने ही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी.....

कि एफआरपी च ही एक भानगड आहे , हे तरी कळायला च हवे.........

MARATHI KAVITA - DIWALI SHUBHECHA

आभाळाच्या सावलीत....आपली माणसं शोधायची....
थोडी आधीच जोडलीयत....अजून थोडी जोडायची...

हसून जगायचं शहाण्यासारखं...मनं नाही मोडायची...
वेड्या अंधाराची जळमट ह्या प्रकाशाने तोडायची...

आयुष्याच्या पटलावरती इच्छांची कधीच कमी नसते....
खूप काही मिळूनही...अजून खूप काही हवे असते.... 

पुरे होवो तुमच्या हरेक इच्छा....
दिपावलीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा..... 

अस काहीस मागण देवाकडे मागत 
सुगी संपली कि आलुतेदार -बलुतेदार मंडळी बाहेर पडतात 
दिवाळीची पोस्त गोळा करायला …

HAPPY DIWALI



आभाळाच्या सावलीत....आपली माणसं शोधायची....
थोडी आधीच जोडलीयत....अजून थोडी जोडायची...

हसून जगायचं शहाण्यासारखं...मनं नाही मोडायची...
वेड्या अंधाराची जळमट ह्या प्रकाशाने तोडायची...

आयुष्याच्या पटलावरती इच्छांची कधीच कमी नसते....
खूप काही मिळूनही...अजून खूप काही हवे असते.... 

पुरे होवो तुमच्या हरेक इच्छा....
दिपावलीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा..... 

अस काहीस मागण देवाकडे मागत 
सुगी संपली कि आलुतेदार -बलुतेदार मंडळी बाहेर पडतात 
दिवाळीची पोस्त गोळा करायला …