"जी माणसे हवीशी वाटतात,
ती कधी भेटत नाहीत..."
"जी नकोशी वाटतात,
त्यांचा सहवास संपत नाही..."
"ज्यांच्याकडे जावेसे वाटते,
त्यांच्याकडे जायला जमत नाही..."
"ज्यांना टाळावेसे वाटते,
त्यांच्याकडे जावेच लागते..."
"जेंव्हा जीवन नकोसे वाटते,
तेंव्हा काळ संपत नाही..."
"जेंव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो,
तेंव्हा काळ निसटलेला असतो..."
"नशीब हे असेच असते,
त्याच्याशी जरा जपूनच वागावे लागते "
"तिथे कोणाचेच चालत नाही,
जिकडे नेईल तिकडे जावेच लागत..
शेवटी काय..!
नाती जपण्यातच मजा आहे,
बंध आयुष्याचे विणण्यातच मजा आहे,
जुळलेले सूर गाण्यातच मजा आहे,
येताना एकटे असलो तरी,
सर्वांचे होऊन जाण्यातच मजा आहे.
"नशीब" कोणी दुसरं लिहित नसतं,
आपल नशीब आपल्याच हातात असतं,
येताना काही आणायच नसतं,
जाताना काही न्यायचं नसतं,
मग हे "आयुष्य" तरी कोणासाठी जगायचं
असतं..?
याच प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठीच तर "जन्माला" यायचं
असतं...

MARATHI KAVITA

दोघांचं सकाळी भांडण होण
तरी जाताना एकमेकान कडे बघण
ऑफिस मध्ये बसून एकमेकांची आठवण काढण
आणि हळूच लंच मध्ये एक मिस काल देण
मी कॉल केल्यावर चुकून लागला म्हणन
आणि ऑफिस मधून येताना माझ्यासाठी गुलाबाची फुले घेण
उगीच मला घरी पोचण्य आधी रस्त्यात भेटायला बोलावण
आणि मग गुलाबाची फुले देऊन खुश करण
दोघांनी घरी जाण्या आधी हॉटेल मध्ये कॉफी पिण
अश्या आठवणी येऊ लागल्या कि अवघड होत
वर्तमाना कडे बघण
आणि मग विचार येतो
पुसटशी तरी आठवण येत असेल कधी तुलाही..................

MARATHI KAVITA

मी म्हंटले मित्राला एकदा
मला प्रेमात पडायचय
कोणीतरी आपल्यावर खूप प्रेम करतं
असलं काहीतरी अनुभवायचाय

मित्र म्हणाला
आरशात बघ न जरा
स्वतःवर प्रेम करायचं शिक जरा
मग बघ किती सुंदर हि धरा

मग मी थोडी विचारात पडले
डोळ्यातून दोन थेंब हि गळले

विचार केला
स्वतःवर प्रेम करायचं कसं?
एकटच प्रेमात पाडायचं कसं?
इतके थेंब अंगावर पडतात
पण एकटच पाऊसात भिजायचं कसं?

मराठी

=तुळशी" ची जागा आता "Money Plant" ने
घेतलीय...!!
="काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय...!!
=वडील जिवंतपणिचं"डैड" झाले, अजुन बरचं काही आहे
आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??
=भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis"...!!
=दिवसभर मुलगा CHATTING चं करतो... नाही तर
रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो...!!
=दुध पाजणारी आई जिवंतपणीचं "Mummy"
झाली...!!॥
=घरची भाकरं आता कशी आवडणार हो... ५ रु. ची Maggi
आता किती"Yummy" झाली...!!
=माझा मराठी माणूसच मराठी ला विसरू लागलाय....
----बघा जमल्यास विचार करुन शेअर करा व
आपली संस्कृती.लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा प्रयत्न
करा ...!!!!!!!!!