MARATHI KAVITA

मी म्हंटले मित्राला एकदा
मला प्रेमात पडायचय
कोणीतरी आपल्यावर खूप प्रेम करतं
असलं काहीतरी अनुभवायचाय

मित्र म्हणाला
आरशात बघ न जरा
स्वतःवर प्रेम करायचं शिक जरा
मग बघ किती सुंदर हि धरा

मग मी थोडी विचारात पडले
डोळ्यातून दोन थेंब हि गळले

विचार केला
स्वतःवर प्रेम करायचं कसं?
एकटच प्रेमात पाडायचं कसं?
इतके थेंब अंगावर पडतात
पण एकटच पाऊसात भिजायचं कसं?