MARATHI KAVITA

रोजच्याच परी, सकाळ कोवळी
विरह मनास, जीव हा तळमळी
चडली प्रीतीवर निराशेची काजळी
सखे ऐक न, मनाची आर्त आरोळी

राग नाही बरा, रुसलीस का अवखळी
प्रेमात मी तुझ्या असे, किती ग प्रांजळी
मन भरून येते, रितीच असतील ओंजळी
किती विनवू तुला, का चिडतेस वेळो-वेळी

तुजवीण ग, जीवनात एक पोकळी
जाणून आहेस, तरी खेळतेस हि खेळी
का उगाच, छटा दावितेस अशी वेगळी
ये परत तू, बघ राहील हा मी निर्जळी ....




Written By : Anamika Author

KOLHAPURI

पुण्यामध्ये पत्ता शोधायचा, विचारायचा तर"जोशी कुठं राहतात 'हे इथं विचारू नये' अशी पाटी वाचायला मिळते. कोल्हापुरात मात्र बरोबर याच्या उलट दृश्य पाहायला आणि अनुभवायला मिळतं. चौकात किंवा कोपऱ्यावरउभ्या असलेल्या मंडळींना पत्ता विचारला तर ते त्या व्यक्तीची इतर माहिती विचारतील आणि एकमेकांत सांगतील.. "अरे,त्या बॉबकटचा बाबा रे! काळं गिड्डं रे ते!'' हे पत्ता विचारणाऱ्याच्यासमोर होऊ शकतं. त्यापुढे पत्ता सांगून रिकामे."हे बघा, सरळ-स्ट्रेट जावा. पुढं एक गोल-सर्कल लागंल, तितनं लेफ्ट मारा (चालतानासुद्धा!). त्या बोळात एकपायपीचा (ट्यूबलाइटचा) डांब (खांब) लागंल.त्याच्या जरा पुढं गेला कीपाण्याची चावी (नळ) दिसंल. तिथंबायका हायेतच; त्या त्यांच्याच!' 'एवढं ऐकून गोंधळलेला पाहुणा आणखी गोंधळू नये म्हणून एखाद्या लहान मुलाला "ए बारक्या,जा ह्यास्नी सोडून ये,'' असं सांगणार. हे सगळं"आपल्या गल्लीत' आलेल्या पाहुण्यांसाठी, हे लक्षात घ्यायचं. ते पाहुणे परत जाताना पुन्हा दिसलेच, तर"पावनं,गावलं नव्हं घर?'' असं आवर्जून विचारणार आणि रिक्षाला हाक मारून पाहुण्यांना त्यात बसवून निरोप देणार."पायीप' म्हणजे ट्यूबलाइट, डांब म्हणजेखांब, चावीम्हणजे नळ...असे बरेच शब्द हे खास कोल्हापुरी शब्दकोशातले, हे समजलं असेलच.त्याचबरोबर अनेक समानार्थी शब्द,वाक्प्रचार, विशेषणं वगैरेंचा स्वतंत्र कोश आहे; पण तो केवळ मौखिक असल्याने समजून घ्यावा लागतो वा अभ्यासण्यासाठी इथंच जन्म घेऊन लहानाचं मोठं व्हावं लागतं........