Republic Day Parade at Chhatrapati Shahu Stadium . 26 th January






प्रजासत्ताक दिनाचा ६१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारंभात शाहू स्टेडियम येथे ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी त्यांना मानवंदना देण्यात आली.






मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मानवंदना स्वीकारली व संचलनाची पाहणी केली.पोलीस सशस्त्र दल,एनसीसी पथक,महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती सदस्य,पोलीस बँड,श्वान पथक,गृहरक्षक दल,बीनतारी संदेश विभाग,महापालिका अग्निशमन दल,आपत्ती व्यवस्थापन,वनरक्षक दल आदी पथकांनी शानदार संचलन केले.यावेळी विज्ञानानाकडे झेप,लेक वाचवा,कोल्हापूरातील कलाकृती,लोकसंस्कृती,भूजल कायदा,जागतिक तापमान वाढ,पर्यावरण वाचवा,स्वच्छता अभियान आदी चित्ररथांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.






शाहू स्टेडियम येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला.सर्वश्री आमदार राजेश क्षीरसागर,महादेवराव महाडिक,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यशोदा कोळी,महापौर वंदना बुचडे,जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख,महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जयश्री भोज, विशेष पोलीस महानिरिक्षक भगवंतराव मोरे,पोलीस अधीक्षक यशस्वी यादव याप्रसंगी उपस्थित होते. स्वातंत्र्यसैनिक,ज्येष्ठ नागरीक व शालेय विद्यार्थी या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होते.





































पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण
शहीद जवानांच्या कुटुंबियांना पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.वीर पत्नी सुवर्णा सुभाष कदम यांना ३ लाख रुपये,वीर माता शांताबाई सुरेश कदम यांना १ लाख रुपये,वीर पिता सुरेश जोतीबा कदम यांना १ लाख रुपये, वीर माता लक्ष्मीबाई विष्णू कांबळे यांना २ लाख ५० हजार रुपये,वीर पिता विष्णू रामा कांबळे यांना २ लाख ५० हजार रुपये देण्यात आले.
पोलीस दलात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल करवीर पोलीस ठाण्यातील मिरासाहेब पठाण आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय पवार यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले.नेहरु युवा केंद्गाच्या वतीने देण्यात येणारा युवा पुरस्कार साधना खोत आणि बाबासाहेब नदाफ यांना प्रदान करण्यात आला. तसेच जनसेवा सामाजिक संस्था,आर्दाळ यांनाही सन्मानित करण्यात आले.पन्हाळा पंचायत समिती, राधानगरी पंचायत समिती आणि आजरा पंचायत समितीला प्रत्येकी २० लाख रुपये देऊन निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार विठ्ठल पाटील यांना प्रदान करण्यात आला.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.photography bytoufique photography KOLHAPUR.