­
KOLHAPUR: Kolhapur Mahostav 2011

Kolhapur Mahostav 2011

KOLHAPUR MAHOSTAV 2011
26 JANUARY TO 30 JANUARY  








कोल्हापूर महोत्सव जागतिक दर्जाचा बनविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.देशात आणि राज्यात कोल्हापूर महोत्सवाचे महत्व वाढत आहे.या महोत्सवामुळे कोल्हापुरच्या पर्यटनास निश्चित चालना मिळेल असे प्रतिपादन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
कोल्हापूर महोत्सवाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते.गृह राज्यमंत्री सतेज पाटील,आमदार सर्वश्री राजेश क्षीरसागर,महादेवराव महाडिक,चंद्गदिप नरके,महापौर वंदना बुचडे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यशोदा कोळी,श्रीमती भाग्यश्री हर्षवर्धन पाटील,श्रीमती प्रतिमा सतेज पाटील तसेच कोल्हापूर महोत्सवाचा ब्रँड अम्बॅसिडर अवधूत गुप्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर महोत्सवाचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शिवाजी स्टेडियम येथे शानदार उद्‌घाटन करण्यात आले.पालकमंत्री म्हणाले,पर्यटनाला चालना देणे,कोल्हापुरची संस्कृती जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविणे आणि कोल्हापुरचा लौकिक जगभरात वाढविणे यासाठी कोल्हापूर महोत्सव साजरा करण्यात येतो.राज्यात या महोत्सवाचे महत्व वाढत असून पुढच्या काळात या महोत्सवाचे आकर्षण वाढेल.




गृह राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले,कोल्हापुरच्या संस्कृतीला स्वतःची वेगळी ओळख आहे.फेस बुकच्या माध्यमातून हा महोत्सव जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे.




कोल्हापूर महोत्सवाचा ब्रँड अम्बॅसिडर अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या‘आय डोन्ट व्हाय’या गाण्याने कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर गेला.रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या आणि अवधूत गुप्तेंचा आवाज यामुळे सर्वजण मंत्रमुग्ध झाले.सार्थ क्रिएशनचे सागर बगाडे यांनी शब्ध्दबध्द केलेल्या‘कोल्हापुरी पोरी लय भारी’या लावणीने रसिकांना थिरकायला लावले.लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,क्रिडा गीत,जो पथ्थर से धार उगाए या कवालीवरील त्यांच्या नृत्याने सर्वांची मने जिंकली.

















परंतु एकूणच कालचा दिवस जिंकला तो चेतना अपंगमती विद्यालय,बाल संकुलातील मुलांनी.त्यांना साथ होती कस्तुरबा गांधी अंध विद्यालय आणि हेल्पर्स ऑफ दि हॅडिकॅप्ड यांची.यारे सारे या,ब्राझी,गोंधळी नृत्य,गौतम बुध्दाचे चरित्र उलगडणारे सिध्दार्थाचा झाला गौतम हे गीत या मुलांनी सादर केले आणि सर्वांना थक्क केले.प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन आम्ही स्वाभिमानाने स्वकर्तृत्वावर स्वतःची वेगळी ओळख आम्ही निर्माण करु शकतो हे या मुलांनी दाखविले.या मुलांचा उत्साह पाहून पालकमंत्रीही भारावले.पालकमंत्री हर्षवर्धन पाटील,गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि इतर मान्यवरांनी मंचावर जाऊन मुलांचे कौतुक केले.अवधूत गुप्तेंची तर मुलांनी गळाभेट घेतली.यावेळी प्राचार्य पवन खेबुडकर आणि शिक्षीका श्रीमती सडोलीकर यांचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.जिल्हाधिकार्‍यांनी शब्दबध्द केलेल्या गितांचे विशेष आकर्षण होते.
































कोल्हापूर महोत्सव गीत म्हणून‘करवीरच्या नावानं चांगभलं’या गाण्याने महोत्सवाला प्रारंभ झाला.सागर बगाडे यांनी दिग्दर्शीत केलेल्या या गाण्यामुळे रसिक भारावले.तत्पुर्वी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी,नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.देशभक्तीपर गीत आणि नृत्यांनी पहिल्या दिवशीचा‘कोल्हापुरच्या नावानं चांगभलं’हा कार्यक्रम रंगला.कोल्हापुरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी आणि नृत्य सादर केले.
शीलादेवी डी.शिंदे आणि उषादेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यामुळे उपस्थितांची मने भारावली.सुरेश कुमार जैन यांचा हसत खेळत जगा कार्यक्रम पार पडल्यानंतर लेसर शोद्वारे कोल्हापुरची उदात्त परंपरा उलगडली.शो पाहताना तुडुंब भरलेल्या शिवाजी स्टेडियममध्ये कमालीची शांतता पसरली होती.लेसर शो पाहताना सर्व प्रेक्षक वर्ग या शोमध्ये हरवून गेला होता.








यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख,विशेष पोलीस महानिरीक्षक भगवंतराव मोरे,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जयश्री भोज,जिल्हा पोलीस प्रमुख यशस्वी यादव,टाटा इंडिकॉमचे जॉय जीम बोस,सचिन ट्रव्हल्सचे सचिन जकातदार,अवर टाऊनच्या प्रतिनिधी निलोफर आदि उपस्थित होते.सोनाली नवांगुळ आणि चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
































































































































Photography by