पत्रकारांनी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज - कुलगुरु



 पत्रकारांचे व्यक्तीमत्व बहुआयामी असणे आवश्यक आहे.माध्यमांची स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असून या प्रक्रियेत टिकण्यासाठी पत्रकारांनी तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.जे.पवार यांनी केले.
विभागीय माहिती कार्यालय,प्रेस क्लब,मास कम्युनिकेशन विभाग,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकारांच्या कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कुलगुरु म्हणाले,पत्रकारांनी वाचन,चिंतन आणि मनन करण्याबरोबरच विविध संस्कृती आणि सामाजिक बदलांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.पत्रकारांनी विशेष कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.लिखित संवाद साधून कमी शब्दात जास्त आशय पोहोचविणे सध्याची गरज आहे.सखोल अभ्यासाशिवाय अचूक माहिती जनतेपर्यंत पोहचवता येत नाही.पत्रकारितेसाठी उत्तम जनसंपर्काची आवश्यकता आहे.






यावेळी कुलगुरुंच्या हस्ते पत्रकारांच्या ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.यावेळी स्टार माझाचे संपादक राजीव खांडेकर,पीपल्स पॉलीटिक्सचे संपादक वसंत भोसले,लोकमतचे संपादक राजा माने,विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक वसंत शिर्के,जेष्ठ पत्रकार एस.के.कुलकर्णी,ई-टीव्हीचे वृत्त समन्वयक राजेंद्ग साठे,कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरुबाळ माळी,जिल्हा माहिती अधिकारी दयानंद कांबळे,सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ.गणेश मुळे,मास कम्युनिकेशनच्या समन्वयक निशा मुढे-पवार,कोल्हापूर,सिंधुदुर्ग,सांगली जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.