एकदा एक मुलगा नेपाळ मध्ये मेंढ्या चारत होता..तितक्यात तिथे एक टुरीस्ट आला..
टुरीस्ट - हि मेंढी किती दुध देते?
मुलगा - पांढरी कि काळी?
टुरीस्ट - पांढरी
मुलगा - २ लिटर देते..
टुरीस्ट - आणि काळी?
मुलगा - ती पण २ लिटर देते.
टुरीस्ट - आणि वूल किती देते?
मुलगा - कोणती काळी कि पांढरी?
टुरीस्ट - काळी
मुलगा - काळी ४ किलो देते.
टुरीस्ट - आणि पांढरी?
मुलगा - ती पण ४ किलो देते..
टुरीस्ट (वैतागून) - अरे येड्या दोन्ही मेंढ्या दुध पण सारखाच देतात आणि वूल पण..मग काळी आणि पांढरी काय लावलंय..
मुलगा - खरं तर हि जी पांढरी मेंढी आहे ना...ती माझ्या वडिलांची आहे..
टुरीस्ट - आणि काळी?
मुलगा - ती पण वडिलांचीच आहे..