राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सव






तिमिराकडून तेजाकडे जाण्यासाठी ग्रंथ महोत्सवांना महत्वाचे स्थान आहे.करवीर नगरीत भरविण्यात आलेल्या राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सवाची प्रेरणा घेऊन वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी राज्यभर असे ग्रंथ महोत्सव भरविणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी केले.
येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर दि.१ ते ४ जानेवारी २०११ पर्यंत भरविण्यात आलेल्या राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सवाचे उद्‌घाटन मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी ग्रंथ महोत्सवाचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील होते.
यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरेशिक्षण विभागाचे उपसंचालक दिनकर पाटीलग्रंथ महोत्सवाचे उपाध्यक्ष डॉ.सुनीलकुमार लवटेप्राचार्य यशवंत पाटणेचंद्गकुमार नलगे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुलांमधील सुप्त गुण पारखून त्यांच्यामधील कलागुणांच्या विकासासाठी शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत असे सांगून श्री.कर्णिक पुढे म्हणाले,प्रतिकूल परिस्थितीतही चांगले जीवन घडवण्याचे काम पुस्तके करतात.विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन करुन ज्ञान ग्रहण करायला हवे.साहित्याकडे डोळसपणे पाहिल्यास उत्तम भवितव्य घडते,हे त्यांनी सोदाहरणासह पटवून दिले.साहित्य संस्कृती रुजवण्यासाठी सर्व थरातून प्रयत्न व्हायला हवेत.राज्यातील प्रत्येक भागात विविध प्रकारची साहित्य निर्मिती होत असल्याचे सांगून श्री. कर्णिक म्हणाले,कलानगरीक्रीडानगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या करवीर नगरीतील हा भव्य स्वरुपाचा साहित्य महोत्सव आहे.लहानपणी अभ्यासाची आवड फारशी नसली तरी केवळ आईची शिकवण आणि शामची आई या पुस्तकातील तत्वे आचरणात आणल्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही मी यशस्वी होत गेलो असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्व पटवून दिले.
जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले,उत्तम करिअर घडवण्याबरोबरच नवी दिशानवा विचार देण्याचे कार्य पुस्तके करतात. या महोत्सवात पुस्तके खरेदी करण्याबरोबरच त्यांचे वाचन करुन ज्ञान ग्रहण करणे गरजेचे आहे.शाहू स्मारक ग्रंथालयासाठी १ लाख रुपयांची पुस्तके या महोत्सवातून खरेदी केली जातील.तसेच स्वतःसाठी ३६५ पुस्तकांचीही खरेदी करणार असल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले,जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शासकीय कार्यालय आवारात पुस्तक विक्री केंद्ग उभारण्यात येणार आहे.तसेच विद्यार्थ्यांची पुस्तक वाचन स्पर्धा भरवून अधिक पुस्तके वाचणार्‍या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून प्रशासनातर्फे वाचन कला अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डी बी पाटील म्हणाले,वाचन संस्कृतीचा विकास करण्यासाठी घरोघरी ग्रंथालये व्हायला हवीत.राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सवाद्वारे वाचक प्रेमींबरोबरच विद्यार्थ्यांनाही सर्व विषयांची पुस्तके या ठिकाणी उपलबध करुन देण्यात आली आहेत.
यावेळी शिक्षण उपसंचालक दिनकर पाटील यांनी लिहिलेल्या ग्रंथ महोत्सव या पुस्तकाचे प्रकाशन मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले.मुख्याध्यापक संघ निर्मित लेक वाचवादेश वाचवा,या पोस्टरचे प्रकाशन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले.
स्वागत दिनकर पाटील यांनी केले.प्रास्ताविकात डॉ.सुनिलकुमार लवटे यांनी ग्रंथ महोत्सवादरम्यान घेण्यात येणार्‍या कार्यक्रमांची माहिती दिली.डॉ लवटे यांनी दिलेल्या न्यू इयर बुक इयर या घोषणेस उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद देऊन परिसर दणाणून सोडला.
ग्रंथ दिंडी संपन्न
राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सवाची सुरुवात सकाळी ९ वाजता गांधी मैदान येथून झाली.ग्रंथ दिंडीचे उद्‌घाटन आमदार चंद्गदीप नरके आमदार भगवानराव साळुंखे महापौर वंदना बुचडे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख विशेष पोलीस महानिरीक्षक भगवंतराव मोरे श्रीमंत शाहू महाराज कुलगुरु डॉ.एन.जे.पवार डी.बी.पाटील डॉ सुनिलकुमार लवटे दिनकर पाटील जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभाग प्रमुख डी.एस.पोवार प्राथमिक शिक्षण विभाग प्रमुख शरद गोसावी,मुख्याध्यापक संघाचे चेअरमन जी.बी.खांडेकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
ग्रंथ दिंडीचे स्वागत बा.भ.बोरकर ग्रंथनगरी येथे मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले.या दिंडीत शहरातील माध्यमिक शाळांचे सुमारे १० हजार विद्यार्थी सहभागी झाले.ग्रंथ पालखीपुढे चित्ररथ झांजपथक लेझीमचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.