कोल्हापूर जिल्ह्याची २०० कोटीची वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ४८ कोटी प्रस्तावित ( Kolhapur Budget 2010)








कोल्हापूर जिल्ह्याचा सन २०११-१२ च्या २०० कोटीच्या प्रस्तावित प्रारुप आराखड्यास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.अनुसूचित जाती उप योजनेच्या (विघयो) ४८ कोटी ९ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली.पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीस गृह व ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा यशोदा कोळी,खासदार सदाशिवराव मंडलिक,आमदार सर्वश्री सा.रे.पाटील,भगवान साळुंखे,चंद्गकांतदादा पाटील,सुरेश हाळवणकर,चंद्गदिप नरके,राजेश क्षीरसागर,के.पी.पाटील,प्रभारी जिल्हाधिकारी तुकाराम कासार,महापालिका आयुक्त विजय सिंघल,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जयश्री भोज,जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश गिरी,तसेच नियोजन समितीचे सदस्य व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
राज्याच्या वित्त व नियोजन विभागाने कोल्हापूर जिल्ह्याच्या विकास आराखड्यासाठी १३७ कोटी २५ लाख रुपयांची मर्यादा निश्चित केली होती.विविध शासकीय विभागांची जादा निधीची मागणी लक्षात घेऊन जिल्ह्याच्या सन २०११-१२ च्या सर्वसाधारण योजनेमध्ये ६२ कोटी ७५ लाख रुपयांची वाढ सुचविण्यात आली आहे,त्यामुळे जिल्ह्याचा प्रारुप आराखडा २०० कोटी रुपयांचा झाला आहे.अनुसूचित जाती उपयोजनेसाठी वित्त विभागाने ३० कोटी २५ लाख रुपयांची मर्यादा निश्चित केली होती.या योजनेतही १७ कोटी ७६ लाख ९२ हजार रुपयांची वाढ सुचविण्यात आल्यामुळे हा आराखडा ४८ कोटी १ लाख ९२ हजार रुपयांचा झाला आहे.आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील आदिवासी योजनेसाठी ४६ लाख २२ हजाराचा प्रारुप आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे.या तीनही योजनांचा एकूण निधी २४८ कोटी ४८ लाख १४ हजार इतका झाला आहे.
अनुसूचित जाती उपयोजनेत २०११-१२ या वर्षात कृषि व संलग्न सेवेसाठी ५ कोटी १३ लाख २० हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.ग्रामीण विकासासाठी ८ कोटी ४६ लाख,सामान्य शिक्षणासाठी ४३ लाख ६८ हजार,क्रीडा व युवक कल्याण यासाठी ८८ लाख इतका निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.सामाजिक व सामुहिक सेवेतील गृह निर्माण,नगर विकास,मागासवर्गीयांचे कल्याण,कामगार कल्याण,समाज कल्याण यासाठी ३० कोटी २५ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
नाविन्यपूर्ण योजनांसाठी ६ कोटी ६९ लाख
कृषि व संलग्न सेवेसाठी २०११-१२ या वर्षात २९ कोटी ६४ लाख १० हजार रुपयांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे,तर ग्राम विकासासाठी ३१ कोटी ६४ लाख ६४ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.सामाजिक सेवेसाठी ५९ कोटी २४ लाख ६८ हजार तर परिवहन योजनांसाठी ३७ कोटी ७९ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.पाटबंधारे व पूर नियंत्रणासाठी १४ कोटी ६५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,तर ऊर्जा क्षेत्रासाठी ५ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.उद्योग व खाण काम यासाठी ३ कोटी ७७ लाख,सार्वजनिक कार्यालय व पायाभूत सुविधा,माहिती व प्रसिध्दी यासाठी २ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.इतर जिल्हा योजनेत जिल्हा नियोजन समितीचे बळकटीकरण,जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण योजनांसाठी ६ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
नाविण्यपूर्ण योजनेत वन,विज्ञान,तंत्रज्ञान व पर्यावरण,अनाथ मुलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण,आयएएस स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन,लेक वाचवा अभियान,जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयांचे आयएसओ मानांकन,तलाठी प्रशिक्षण,साहसी खेळांचा प्रसार व प्रचार,जिल्ह्यातील बारा तालुक्यातील प्रत्येकी एका महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्ग सुरु करणे,शेतकर्‍यांसाठी हेल्प लाईन,ग्रामीण रुग्णालयांना टेलिमेडिसीन व डायलेसीस, जिल्ह्यात आयटी परिषद भरविणे,अपंगांना उपकरणे आदि २१ नाविण्यपूर्ण योजनांसाठी ६ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

२०१०-११ सालासाठी १६ कोटी रुपयांचे पुनर्वाटप

सन २०१०-११ या वर्षातील विविध विभागांची मागणी लक्षात घेऊन १६ कोटी ३ लाख रुपयांचे पुनर्वाटप करण्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली.गाभा क्षेत्रासाठी ११ कोटी ३८ लाख ७४ हजार तर बिगर गाभा क्षेत्रासाठी ४ कोटी ६४ लाख २८ हजार रुपयांचे पुनर्वाटप करण्यात आले.गाभा क्षेत्रातील कृषि व संलग्न सेवा,ग्रामविकास,सामाजिक सेवा व नाविण्यपूर्ण योजनांसाठी या निधीचे पुनर्वाटप करण्यात आले.सन २०१०-११ या वर्षात सर्वसाधारण वार्षिक योजनेत मंजुर झालेल्या १४२ कोटी ५ लाख रुपयांपैकी प्रत्यक्ष १०४ कोटी ५७ लाख ५६ हजार इतका निधी प्राप्त झाला होता,या प्राप्त तरतुदीपैकी ८८ लाख ८१ हजार ६५ रुपये इतका निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे.वितरित निधीपैकी ४३ लाख ४७ हजार इतका खर्च झाला आहे.अनुसूचित जाती उपयोजनेत २२ कोटी ९५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते,त्यापैकी १३ कोटी ७५ लाख ६२ हजार रुपये अर्थसंकल्पित करण्यात आले,तर ९ कोटी ९५ लाख इतका निधी प्राप्त झाला.वितरित निधीपैकी ७२ टक्के निधी खर्च करण्यात आला आहे.आदिवासी योजनेच्या खर्चाची टक्केवारी ५१ टक्के इतकी आहे.
नाविण्यपूर्ण योजना
सन २०१०-११ या वर्षात घ्यावयाच्या नाविण्यपूर्ण योजनांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली.या नाविण्यपूर्ण योजनेत पश्चिम घाटातील महत्वाच्या औषधी वनस्पती प्रजातीचे वृक्षालय जतन करणे,१२१ प्रकारच्या औषधी वनस्पती वृक्षांची लागवड करणे यासाठी २३ लाख ४० हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.जिल्ह्यातील तहसिल कार्यालयांमध्ये सौर साधनांचा कार्यक्रम राबविण्यासाठी ४७ लाख तर जिल्हा माहिती कार्यालयाचे सक्षमीकरण करण्यासाठी ४५ लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत.ग्रामीण भागातील महिला सदस्यांचे सबलीकरण व प्रशिक्षणासाठी ३० लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत.महिला सबलीकरणामध्ये जिल्हा परिषदेच्या २६ महिला सदस्य,पंचायत समितीच्या ५२ महिला सदस्य,३३० महिला सरपंच व ९५२ ग्रामपंचायत महिला सदस्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
मिशन कोल्हापूर गोल्डसाठी १ कोटी रुपये
मिशन कोल्हापूर गोल्ड या खेळाडू घडविणार्‍या नाविण्यपूर्ण योजनेसाठी प्रती वर्षी २५ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येणार आहे.पुढील चार वर्षात या योजनेवर १ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
.
प्रारंभी प्रभारी जिल्हाधिकारीᅠतुकाराम कासार यांनी स्वागत केले.जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हंबीरराव मोहिते यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.