हातून घडलेल्या गुन्हयांमुळे कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाही गजानन बाळासाहेब खडके यांनी आपली लेखन कला सुरु ठेवली आहे. हुपरी लेखणी सम्राट या स्पर्धेसाठी त्यांनी ' फॅशनचे वाढते स्वरुप व भारतीय संस्कृती ' या विषयावर निबंध सादर केला होता. संस्थेतर्फे त्यांना रोख १ हजार ५०० रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कळंबा कारागृहाचे अधीक्षक जे. एस. नाईक यांनी खडके यांचे पुणे येथील अप्पर पोलीस महासंचालक, (कारागृह) संजयकुमार वर्मा यांच्यातर्फे अभिनंदन केले व लेखन कलेस चालना दिली. कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी एम.एन.कांबळे, डी.जी. गावडे तसेच शिक्षक एस.आर.जाधव व एच.बी.बिराजदार यांनी गजानन खडके यांना मार्गदर्शन केले
कारागृहातील बंदी ठरला लेखणी सम्राट
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कृती कार्यक्रम -- परिवहन आयुक्त दिलीप जाधव
पोलीस अधीक्षक यशस्वी यादव यांनी वाहतूकीत सुरळीतपणा आणण्यासाठी आयोजिलेल्या विविध उपायांची माहिती देताना सांगितले, नव वर्षाचे स्वागत करतांना वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम व शिस्त स्वयंस्फूतर्ीेने पाळल्यास अपघाताच्या प्रमाणात निश्चितच घट होईल. वाहतूकीस शिस्त लावण्याच्या दृष्टीने कोल्हापूर पोलीस विभागाने फेस बुक या सोशल वेबसाईटवर फेंडस् ऑफ कोल्हापूर पोलीसची निर्मिती केली असून वाहतूकीचे नियम मोडणार्या वाहनांचे व्हिडीओ चित्रीकरण अथवा छायाचित्रे या वेबसाईटवर पाठविल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. मद्य प्राशन करुन वाहन चालविणार्या वाहन चालकांवर वाहन परवाना जप्ती तसेच दंडात्मक कारवाई केली जाईल. बाहेर गावाहून येणार्या पर्यटकांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना पोलीस दलाला करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सन २०११ पासून दि. १ ते ७ या कालावधीत राबविण्यात येणार्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या कालावधीत वाढ करुन तो दि.१५ जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे. वाहनधारकांना आपल्या जुन्या वाहनाचा नोंदणी क्रमांक नवीन वाहनांवर नोंद करण्यासाठी नंबर पोर्टबिलीटी सुविधा सुरु करण्यात आली आहे. वरील तिन्ही जिल्ह्यात वाहतूकीस सुरक्षित आणि अपघात विरहित किंवा अपघातांचे प्रमाण अत्यंत कमी असलेला रस्ता आणि घाट याचा शोध घेऊन तो रस्ता किंवा घाट तयार केलेल्या अभियंत्याचा रस्ता सुरक्षा समिती मार्फत सत्कार करण्यात येणार आहे. एस.टी., के.एम.टी. रिक्षा,टॅक्सी, ट्रक या व्यवसायातील विना अपघात वाहन चालविणार्या चालकाचा खास प्रमाणपत्र देऊन रस्ता सुरक्षा समितीमार्फत सत्कार करण्यात येणार आहे. तिन्ही जिल्ह्यातील कॅम्पचे ठिकाणी शिकाऊ तसेच पक्क्या लायसन्ससाठी येणार्या उमेदवारांना सुरक्षित वाहतूकीच्या नियमांची तसेच चिन्हांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच खाजगी वाहनातून होणारी अवैध प्रवासी वाहतूक, घरगुती वापराच्या गॅसचा इंधन म्हणून वापर करणार्या रिक्षा, भार क्षमतेपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करणार्या काळी, पिवळी टॅक्सी यासारख्या वाहनांची या कालावधीत विशेष तपासणी म्हणून राबविण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची २०० कोटीची वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ४८ कोटी प्रस्तावित ( Kolhapur Budget 2010)
कोल्हापूर जिल्ह्याचा सन २०११-१२ च्या २०० कोटीच्या प्रस्तावित प्रारुप आराखड्यास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.अनुसूचित जाती उप योजनेच्या (विघयो) ४८ कोटी ९ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली.पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली.
.
शाहू स्मारकाच्या निमित्ताने....
२६ ते ३० जानेवारी दरम्यान कोल्हापूर महोत्सवाचे आयोजन
कोल्हापूर महोत्सवाचे आयोजन दि.२६ ते ३० जानेवारी २०११ या कालावधीत होणार आहे.दि.२६ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून लेसर शो कार्यक्रमाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
बायोगॅस उभारणीत कोल्हापुरची आघाडी
सेव्ह द बेबी गर्लला द.आशिया स्तरावरचा मंथन पुरस्कार 20/12/2010
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सेव्ह द बेबी गर्ल या उपक्रमास दक्षिण आशिया स्तरावरचा प्रतिष्ठीत मंथन पुरस्कार मिळाला आहे.२०१० सालातील सर्वोत्कृष्ट संशोधनात्मक प्रयोग म्हणून या उपक्रमास हा पुरस्कार मिळाला आहे.नॅसकॉम, ई-इंडिया या पुरस्कारानेही सेव्ह द बेबी गर्ल उपक्रमास यापूर्वीच गौरविले आहे.मंथन पुरस्कारामुळे सेव्ह द बेबी गर्ल हा उपक्रम पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.या पुरस्काराचे वितरण नवी दिल्ली येथे नुकतेच करण्यात आले.दक्षिण आशिया स्तरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या उपक्रमांना हा पुरस्कार देण्यात येतो.अफगानीस्तान,बांगला देश,भूतान,भारत,मालदिव,नेपाळ,श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांतील माहिती तंत्रज्ञानावर आधारित शंभरहून अधिक उपक्रम मानांकित करण्यात आले होते.ई-शिक्षण,ई-मनोरंजन,ई-पर्यटन,ई-व्यवसाय व व्यापार,ई-आरोग्य,ई-पर्यावरण,ई-विज्ञान,ई-शेती अशा वर्गवारीमध्ये राबविण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान उपक्रमास मंथन पुरस्कार देण्यात येतो.सेव्ह द बेबी गर्ल या उपक्रमास ई-आरोग्य (हेल्थ) या वर्गवारीमध्ये मानांकन मिळाले होते.१८ डिसेंबर २०१० रोजी नवी दिल्ली येथे एका समारंभात पुरस्काराची घोषणा करण्यात आली.ई-आरोग्य या उपक्रमांतर्गत त्रिपुरा राज्याच्या त्रिपुरा व्हिजन सेंटर या उपक्रमास मंथन पुरस्कार देण्यात आला तर सेव्ह द बेबी गर्ल या उपक्रमास सर्वोत्कृष्ट संशोधनात्मक प्रयोग म्हणून पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी स्वीकारला.मंथन पुरस्कार माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय,नवी दिल्ली तसेच डिजीटल एम्पॉवरमेंट फौंडेशन,आयएमआय मोबाईल,मोबिलीटी फंड,इंटेल यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जातो
'लखपती माझी कन्या 'अभियानात सहभागी व्हा..! -- जिल्हाधिकार्यांचे आवाहन
दारिद्गय रेषेखालील व मागासवर्गीय घटकांतील कुटुंबात जन्मास येणार्या प्रत्येक मुलींमागे ६ हजार रुपयांची ठेव जमा करुन लखपती माझी कन्या या अभियानात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व सरपंचांना केले आहे
जिल्हा प्रशासनाने सेव्ह द बेबी गर्ल,सायलेंट ऑब्झर्व्हर,लिंगनिदान प्रतिबंध अशा विविध उपक्रमांव्दारे जिल्ह्यातील हजार पुरुषांमागे स्त्रियांचा जन्मदर ८३९ वरुन ८७५ इतका नेण्यात यश मिळविले. या प्रयत्त्नांमुळे व प्रबोधनामुळे पुढील काळात मुलींचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे.जन्माला आलेल्या मुलींचे स्वागत करणे,तीचे शिक्षण करुन तिला स्वावलंबी व सुजाण बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने लेक माझी लखपती या सामाजिक अभियानात जिल्ह्र्यातील सर्व सरपंचांनी सहभागी होण्याबाबत जिल्हाधिकार्यांनी आवाहन केले आहे.जानेवारीᅠ२०११ पासून दारिद्गय रेषेखालील व मागासवर्गीय कुटुंबात जन्मास येणार्या प्रत्येक मुलींमागे दरवर्षी २ हजार रुपयांप्रमाणे ३ वर्षे एकूण ६ हजार रुपये भरले तर बजाज अलायन्स कंपनीतर्फे रुपये ४० हजार रुपयांचे विमा संरक्षण व रुपये ६० हजारांची रक्कम मुलीच्या २१ साव्या वर्षी देता येईल.त्यातून तिचा पुढील शिक्षणाचा व लग्नाचा खर्च गरीब कुटुंबास भागविता येईल. अशा तर्हेने गरीब कुटुंबास मदत केली तर ते मुलीच्या जन्माचे निश्चित स्वागत करतील.लिंग निदान करुन मुलीचा गर्भपात करणार नाहीत व तिला किमान १२ वी पर्यंत शिकवू शकतील.यासाठी हे अभियान जानेवारी २०११ ते डिसेंबर २०१५ पर्यंत राबवून जिल्ह्यातील स्त्री जन्माचे प्रमाण हजार पुरुषांमागे ९५० पेक्षा जास्त होईल,अशी अपेक्षाही जिल्हाधिकार्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
लखपती माझी कन्या या अभियानात सहभागी होण्याचे कळकळीचे आवाहन करुन जिल्हाधिकार्यांनी डिसेंबर अखेर अभियानात सहभागी होण्याबाबत ठराव करुन तो ठराव गावातील तलाठयाकडे द्यावा,असे सरपंचांना पत्राव्दारे कळविले आहे.
savethebabygirl
क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील कामे मार्च अखेर पूर्ण करावीत-जिल्हाधिकारी
विभागीय क्रीडा संकुलाच्या बांधकामाचा दर्जा उत्तम आणि दर्जेदार राखून पहिल्या टप्प्यातील कामे मार्च २०१० अखेर पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज आढावा बैठकीत दिल्या.
अपंग खेळाडुंसाठी मिशन कोल्हापूर गोल्ड अपंग व्यक्तीनिर्मित वस्तुंसाठी विक्री केंद्ग उभारणार
५० व्या जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व चेतना अपंगमती विकास संस्थेच्यावतीने अपंगांच्या कला अविष्कारासाठी आयोजित यारे-सारे-या या चेतनामय आनंद मेळ्याच्या उद्घाटन प्रसंगी श्री.देशमुख बोलत होते.शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.जे.पवार,समाज कल्याण अधिकारी सौ.वृषाली शिंदे,जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती गोपाळ कांबळे,प्राचार्य पवन खेबुडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अपंग बांधवांसाठी आयोजित केल्या जाणार्या अशा आनंद मेळ्यातून एक अनोखी प्रेरणा व उमेद मिळेल.निव्वळ सहानुभूती न दर्शविता अपंगांना मेत्रीचा हात पुढे करुन त्यांना मैत्री,आस्था,प्रेम व आधार द्यावा.जिल्ह्यातील सर्व अपंगांच्या शाळा व संस्थानी एकत्रित येवून उत्तम नेटवर्क उभारले तर त्यांच्या समस्यांचे निराकरण,शासकीय मदत,नवे उपक्रम यात सुसुत्रता येईल.
अपंगांच्या अशा आनंद मेळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ५ लाख रुपयांची तरतूद करण्याबाबत प्रयत्न केले जातील असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले,अपंगांनी केलेल्या विविध वस्तु,शैक्षणिक व कार्यालयांसाठी बनविलेली साधने यांच्या विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विक्री केंद्ग उभारले जाईल.
कुलगुरु डॉ.एन.जे. पवार म्हणाले,आनंद मेळ्यातून अपंग विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलाविष्कार पाहिले तर या विद्यार्थ्यांना अपंग न म्हणता विशेष अंग व विशेष क्षमता धारण केलेले विद्यार्थी म्हणणे उचित ठरेल.अशा प्रकारच्या आनंद मेळ्याचे स्वरुप विस्तृत झाल्यास अपंग विद्यार्थ्यांचे कलागुण जगापुढे येण्यास मदत होईल.
उद्योजक मोहन घाटगे यांनी समाजाने सहानुभूतीपेक्षा अपंगांना सर्व प्रकारचे पाठबळ द्यावे.विप्रो या प्रसिध्द कंपनीचे सर्वेसर्वो अझिज प्रेमजी यांनी अपंग कल्याणासाठी ८ हजार कोटींची भरीव मदत केल्याचे सांगून श्री.घाटगे यांनी जिल्ह्यातील उद्योजक व उद्योग संस्थांनी अपंग कल्याणासाठी आर्थिक पाठबळ द्यावे असे आवाहन केले.
जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती गोपाळ कांबळे यांनी अशा प्रेरणादायीᅠकार्यक्रमांचे आयोजनासाठी सहाय्य केले जाईल असे सांगितले.समाज कल्याण अधिकारी सौ.वृषाली शिंदे यांनी अपंग कल्याणासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.प्रास्ताविकात प्राचार्य पवन खेबुडकर यांनी आनंद मेळ्याच्या आयोजनाची माहिती देवून अपंगांच्या समस्यांचा आढावा घेतला.
प्रा.पवन खेबुडकर लिखित यारे-सारे-या या गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला.ज्ञान प्रबोधन अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.यावेळी मूकबधीर शाळा तिळवणीच्या विद्यार्थ्यांनी देश रंगीला रंगीला,सन्मति मतिमंद मुलांची शाळा,इचलकरंजीच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ तर वि.म.लोहिया मूक बधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गीतावर आकर्षक नृत्य करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.
यावेळी पॅराऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या मंजिरी कुलकर्णी-(सायकल स्पर्धा) केदार देसाई-(पॉवर लिफ्टींग),रोहित पांढरे (रोलर स्केटिंग) या अपंग खेळाडुंचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अंधविद्यार्थीनी कु.सुनिता सनदी,कर्णबधिर विद्यार्थीनी कु.ज्योती कांबळे,अपंग विद्यार्थी वैभव जोगळेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील विविध अपंग शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी सकाळी ९ वाजता रन फॉर डिसॅबिलीटी या मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.लकी बाजार येथून मॅरॅथॉनला प्रारंभ झाला.राजारामपुरी,जनता बझार,फोर्ड कॉर्नर,बिंदू चौक मार्गे जाऊन प्रायव्हेट हायस्कूल येथे मॅरॅथॉनची सांगता झाली.मॅरेथॉन स्पर्धेत तिळवणीच्या रोटरी कर्ण बधिर विद्यालयाच्या वैभव जाधव याने प्रथम तर याच विद्यालयाचा अरुण रावळ याने द्वितीय आणि कोल्हापुरच्या बाल कल्याण संकुलच्या अजित पाटील याने तृतीय क्रमांक पटकाविला.मुलींमध्ये वि.म.लोहिया मुक बधिर विद्यालयाची श्रध्दा जमादार हिने प्रथम,उषाराजे हायस्कूलच्या प्रियांका चव्हाण हिने द्वितीय तर याच हायस्कूलच्या निकिता गवळी हिने तृतीय क्रमांक पटकाविला.दि.३ ते ५ डिसेंबरपर्यंत चालणार्या आनंद मेळाच्या निमित्ताने अपंगांनी बनविलेल्या विविध गृहपयोगी व कलात्मक वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.फनफेअर,पपेट शो,मॅजिक शो,कलाविष्कार आणि विविध खाद्य पदार्थाचें स्टॉलस् आनंद मेळाचे आकर्षण ठरले आहे.
आनंद मेळ्यास जिल्हयातील विविध अपंग व मूक बधिर शाळा,अपंग कल्याण संस्था,अपंग विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन सोनाली नवांगूळ तर आभार दिलीप बापट यांनी केले.